सांगली : ऑल इंडिया सिल्व्हर अँड गोल्ड असोसिएशनचे संस्थापक प्रतापराव शेठ साळुंखे (वय ८३) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : देशात दहा महिन्यांत १५० हून अधिक वाघांचा मृत्यू; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण

प्रतापराव साळुंखे यांचे मूळ गाव खानापूर तालुक्यातील पारे आहे. देशभरामध्ये विस्तारलेल्या गलाई व्यवसायाची मुहुर्तमेढ त्यांनी केरळमध्ये रोवली. साळुंखे यांची केरळ येथील नामांकित उद्योजक, शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन आणि शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून होती ओळख होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli founder of all india silver and gold association prataprao sheth salunkhe passes away css