सांगली : कोयनेतून सांगलीसाठी सोडण्यात येणार्‍या पाण्याबाबतचा वाद आमचा घरगुती मामला असल्याचे सांगत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना अधिक भाष्य करणे टाळले. याबाबत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाणी सोडण्यात सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे अडथळे आणत असल्याचा आरोप केला होता. पावसाच्या हंगामापासून कृष्णा नदी कोरडी पडण्याचा प्रकार तीन वेळा घडला. तर कोयनेतून पाण्याचा विसर्ग वेळापत्रकाप्रमाणे होत नसल्याने ताकारी योजना बंद पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या वाट्याला असलेले ३५ टीएमसी पाणी वेळेत मिळावे, शासकीय यंत्रणेकडून कोयनेतून विसर्ग करण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी करीत भाजपचे खासदार पाटील यांनी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत मंत्री देसाई यांच्या हस्तक्षेपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री खाडे यांना कोयनेतून पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीने होणार, असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी हा आमचा घरगुती मामला आहे असे सांगत बोलणे टाळले.

हेही वाचा : “ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव”; छगन भुजबळांच्या आव्हानावर जरांगे म्हणाले, “जेलमध्ये…”

मिरज विधानसभा मतदार संघात गत निवडणुकीत आपले मतदान ९३ हजारांवरून ९६ हजार झाले. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी विरोधकांकडून केवळ एकच उमेदवार समोर होता, यामुळे मताधिक्य घटले असले तरी भाजपचे मतदान वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघात विकासाची कामे केली असल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी मुद्देच नसल्याचे पालकमंत्री खाडे यांनी म्हटले आहे.