सांगली : नाट्यपंढरी सांगलीत शुक्रवारी मुहुर्तमेढ विधीने शंभराव्या नाट्यसंमेलनाचा प्रारंभ होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. या सोहळ्यानिमित्त गुरुवार दि.२८ डिसेंबर रोजी सायंकाळी संगीतभूषण कै.राम मराठे फाऊंडेशन आणि कला भारती, मुंबई प्रस्तुत संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. शुक्रवार दि.२९ रोजी सकाळी १०.३० वाजता मुहुर्तमेढीचा मुख्य सोहळा विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे होणार आहे. यावेळी प्रेमानंद गज्वी, जब्बार पटेल, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, सांगली, परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदी उपस्थित राहणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा