सांगली : मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानावर चार दिवस चालणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेमध्ये सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील विविध महाविद्यालयांचे ३० संघ सहभागी झाले आहेत.

आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा दि. २४ मार्चपर्यंत चालणार आहे. खिलाडू वृत्तीने खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष भोकरे यांनी सांगितले. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी खेळासारखा अन्य पर्यायच असू शकत नाही. मन:शांतीबरोबरच आरोग्य अबाधित राखण्यासाठी खेळाची गोडी असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

या वेळी तज्ज्ञ संचालक अरुण पुराणिक, प्रशासकीय संचालिका धनश्री चक्रबोर्ती, औषधनिर्माणशास्त्र पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप शेळके आणि विविध कॉलेजचे प्राचार्य आणि क्रीडाशिक्षक उपस्थित होते. सहप्राध्यापक श्रद्धा बंडगर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी विविध फार्मसी कॉलेजचे क्रीडा शिक्षक व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Story img Loader