सांगली : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णालयांची गुणवत्ता आणि दर्जा उंचाविण्याकरता राज्य शासनाने ‘कायाकल्प’ उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील १३४ रुग्णालयाचे मूल्यांकन झाले. या सर्व रुग्णालयांत उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूरने बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ, ग्रामीण रुग्णालय तासगाव, चिंचणीवांगी व शिराळा या रुग्णालयांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला आहे.
हेही वाचा : Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त? तुमच्या शहरात आजचा भाव काय?
इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय कायकल्प पुरस्काराप्रित्यर्थ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार म्हणून सुमारे २० लाख रुपये व प्रशस्तीपत्र तर उत्तेजनार्थ विजेत्या रुग्णालयांना सुमारे एक लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे . या कामी उपसंचालक डॉ दिलीप माने, श्रीमती आशा कुडचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . विक्रमसिंह कदम, डॉ नरसिंह देशमुख , डॉ विनायक पाटील, श्रीमती दिप्ती धुमाळ यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले . ‘कायाकल्प’ या उपक्रमाअंतर्गत इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्हाधिकारी डॉ . राजा दयानिधी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आनंद व्यक्त करून संबंधिताचे अभिनंदन केले .