सांगली : कायम अवर्षणग्रस्त असतानाही जतचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला नसल्याने जतमध्ये प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांने तहसिलदारांची मोटार बुधवारी सकाळी फोडली. मोटारीच्या काचावर काठीने मारुन शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. जत तालुक्यावर पुन्हा शासनाकडून अन्याय दुष्काळ च्या यादीतुन जत तालुक्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे तहसीलदार यांची गाडी आज सकाळी फोडली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्याच्या यादीत जिल्ह्यातील खानापूर, मिरज, शिराळा, कडेगाव या तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. जतसह आटपाडी, तासगाव व कवठेमहांकाळ या चार तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.
First published on: 01-11-2023 at 15:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli jat tahasil people trashed car of tahasildar over drought issue asj