सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी सोमवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. रविवारी सांगलीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीवेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित आमदार, खासदार यांना मराठा आरक्षणाबाबत धारेवर धरले. यावेळी सर्वच लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षण प्रश्‍नी राजीनामे द्यावेत, विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा आग्रह शासनाकडे धरावा आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. आक्रमक कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून लोकप्रतिनिधींनी आज मराठा आरक्षणासाठी एक दिवसांचे उपोषण करण्याचे जाहीर केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपोषण केले. यामध्ये खा.संजयकाका पाटील, आमदार डॉ.विश्‍वजित कदम अनिल बाबर, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विक्रमसिंह सावंत, अरूण लाड, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नितीन शिंदे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा : सांगली : विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाजाचा मोर्चा

विट्यात सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षण मागणीसाठी सोमवारी विटा येथील प्रशासकीय इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न शंकर नाना मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ५० कार्यकर्त्यांनी केला. यावेळी प्रशासनाच्यावतीने आंदोलक मोहिते यांचा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संवाद साधून देण्यात आला. पालकमंत्र्यांच्या शिष्टाईनंतर आंदोलक शांत झाले. मात्र शासनाने आमच्या भावनांची दखल वेळेत घेतली नाही तर उद्रेक होईल असा इशाराही देण्यात आला.