सांगली : परप्रांतीय कामगाराचे अपहरण करून खंडणीसाठी मारहाण करीत ओलीस ठेवण्याचा प्रकार मिरजेत घडल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातून मंगळवारी मिळाली. याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितबंधन फागु पासवान (वय २८, रा.मलाद, गोरखपूर उत्तरप्रदेश) याला मिरज ग्रामीण बसस्थानकावरून दुचाकीवरून अपहरण करून कुपवाड परिसरात नेऊन भ्रमणध्वनी व रोख २ हजार रूपये काढून घेतले. तसेच उजव्या हातावर चाकूने वार करून लोखंडी सळी व लाथाबुक्क्यांनी रात्रभर मारहाण केली.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान, जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळवणारे पहिले भारतीय
त्याला जिवंत सोडण्यासाठी कुटुंबिय व मित्र अशोक पासवान यांच्याकडे फोनद्बारे एक लाखाची खंडणी मागितली. या प्रकरणी संजू उर्फ खुदबुद्दीन शेखर कांबळे, शहजाद सलीम शेख, साईनाथ गोविंद कांबळे आणि सदानंद उर्फ नन्या सुनील माने या चार संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.