सांगली : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य नियुक्तीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली असताना आणखी पाच जणांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात यावे असे निर्देश मंगळवारी नियोजन विभागाचे उप सचिव नि. भा. खेडकर यांनी दिले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी गेल्या महिन्यात नियोजन मंडळाच्या निमंत्रित सदस्यांची यादी शासन मंजुरीसाठी पाठवली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने ही यादी रखडली होती. पालकमंत्री खाडे यांच्या यादीवर शासन निर्णय होण्यापुर्वीच दादा गटाचे वैभव पाटील, सुनील पवार, पुष्पा पाटील व प्रा. पद्माकर जगदाळे यांची नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : VIDEO : अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बेदरकार एटीव्हीचा अपघात व्हायरल, बेकायदेशीर एटीव्हीचा प्रश्न चव्हाट्यावर

यानंतर तब्बल दहा दिवसांनी २५ जानेवारी रोजी नियोजन समिती सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ व अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, तानाजी पाटील, पोपट कांबळे, विनायक जाधव, भीमराव माने, सुहास बाबर यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र, खासदार संजयकाका समर्थक सुनील पाटील, राष्ट्रीय समाज पार्टीचे लक्ष्मण सरगर यांची व जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची नावे शिफारस होउनही वगळण्यात आली.

हेही वाचा : सांगली : चिडवल्याच्या कारणाने वर्गमित्रावर शाळेत कोयत्याने हल्ला

दरम्यान, मंगळवारी पुन्हा शासनाकडून पाच जणांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये अजितदादा गटाचे माजी नगरसेवक अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात यांच्यासह जनसुराज्यचे कदम आणि रासपचे सरगर व सुनील पाटील यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या पाच जणांना नियोजन समितीच्या बैठकीस निमंत्रित करण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli more 5 members invited for district planning committee meeting css
Show comments