सांगली : जयश्री रामचा जयघोष करीत रविवारी सांगलीतील प्रमुख मार्गावरून मंगल अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्यासह महापालिकेतील माजी सदस्य, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोकीवर कलश घेऊन महिलांही मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाल्या होत्या. श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा पुढील महिन्यात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन रविवारी सांगलीत करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : प्रिसिजन जागतिक महिला मानांकन खुले टेनिस : एकेरीत भारताची सहजा यमलापल्ली विजेती

लेझीम पथक, वारकरी शोभायात्रेत सहभागी झाले होते. यात्रेतील सहभागी रामभक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष सुरू होता. या यात्रेत रामभक्त हनुमानाच्या वेषातील कार्यकर्त्यांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत खासदार पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, केळकर महाराज, कोटणीस महाराज यांनीही सहभाग घेतला, महापालिकेतील माजी सभागृह नेत्या भारतीताई दिगडे, माजी सभापती गीतांजली भोपे-पाटील, केदार खाडिलकर, डॉ. भालचंद्र साठ्ये आदींसह अनेक कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.