सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी मला राज्यभर फिरावे लागणार आहे. यामुळे विरोधकांकडून लक्ष्य केले जाऊ शकते. कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नसली तरी गाफीलही राहू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.

इस्लामपूर येथे वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या वतीने राजारामबापू पाटील शिक्षण व उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील, राजारामबापू सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. सावंत, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
union minister pratap rao jadhav meet cm devendra fadnavis in buldhana
प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू
Sharad Pawar appreciate Rss work , Sharad Pawar,
संघाच्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली
Elgar Sanghatanas march in Trimbak for houses
नाशिक : घरांसाठी त्र्यंबकमध्ये एल्गार संघटनेचा मोर्चा
Financial assistance, inter-caste marriages, eligible
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?
Fort protection campaign at the foot of Sinhagad pune news
सिंहगडाच्या पायथ्याशी गडरक्षण मोहीम

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बच्चू कडू यांचा इशारा; म्हणाले, “उचलून थेट…”

पाटील म्हणाले, की आपल्या राज्यातील वाढत्या राजकीय प्रभावातून शिक्षण संस्थेसह आपल्या संस्थांची प्रगती झाली आहे. बँक भक्कम स्थितीत आहे, मात्र साखर कारखाना व दूध संघास खासगी संस्थांच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासारखे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मला राज्यात फिरावे लागणार असल्याने आपण आपल्या भागाची जबाबदारी घेऊन कामाला लागावे. प्रारंभी कामगार नेते शंकराव भोसले यांनी स्वागत केले. साखर कामगार संघाचे कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader