सांगली : संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सांगलीत एनडीआरएफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती प्रसंगी बचाव प्रात्यक्षिक करण्यात आली. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफचे प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्या उपस्थितीत कृष्णा नदी पात्रामध्ये हे प्रात्यक्षिक संपन्न झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्यक्ष आपत्ती काळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करायचा , यासाठी कोणकोणती घरगुती साधने वापरायची याची माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष नदीपात्रात जवानांनी उतरून आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपला बचाव कसा करू शकतो हे सर्वांना प्रात्यक्षिक अशा माध्यमातून दाखवून दिले. एनडीआरएफची टीम दि. १६ जूनपासून सांगलीमध्ये दाखल झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ अशा संयुक्तरित्या विविध विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. आणि आज प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये या सर्व अधिकारी कर्मचारी यांना एनडीआरएफकडून आपत्ती काळातील बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.

हेही वाचा : सोलापूर : उजनी पाणी वाटपात शिस्त आणून सिंचन वाढविण्यास प्राधान्य, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा मनोदय

एनडीआरएफ पथक दि. ३० ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असणार आहे . हे पथक उद्यापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहे. यदाकदाचित पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन , महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ यंत्रणा ही सर्व यंत्रणेसहित असल्याची माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफ पथक प्रमुख यांनी माध्यमांना सांगितले. या प्रात्यक्षिकावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे , सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते आदींसह महसूल व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli ndrf demonstration for flood disaster relief css
Show comments