सांगली : देशाचे संरक्षण करणार्‍या सैनिकांना अधिक आत्मबल मिळावे यासाठी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी राखी पाठविण्याचा उपक्रम स्तूत्य असल्याचे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंगळवारी व्यक्त केले. रक्षाबंधनाचे महत्व लक्षात घेऊन सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी आज न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठविण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं, शेतकऱ्याला…”, शिंदे गटाचा मोदी सरकारला घरचा आहेर

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद परमशेट्टी, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, डॉ. विकास पाटील, बाबासाहेब आळतेकर, शाळेचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण आदी उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करीत पाहुण्यांचे स्वागत केले. मुलांना शालेय वयातच शिस्त लावण्याचे आणि देशाभिमान जागृत करण्याचे काम शिक्षकाकडून होत असल्याबद्दल श्री. फुलारी यांनी कौतुक केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli new english school students sent handmade rakhi to soldiers css