सांगली: मनोज जरांगे नावाचे भूत मानगुटीवर बसवून घेतले तर याची फारमोठी किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी रविवारी सांगलीत पत्रकार बैठकीत दिला. यावेळी त्यांच्यासमवेत ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णु माने आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रा. हाके म्हणाले, सगेसोयर्‍यांना आरक्षण मिळाले नाही तर २८८ आमदार पाडण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यातून त्यांचा राजकीय अजेंडाच दिसतो. कारण ज्यांना पाडायचा इशारा त्यांनी दिला ते सर्व यांचेच आमदार आहेत. जरांगेचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा नसून तो आजपर्यंत जे सत्तेत आहेत, त्यांचाच आहे. कारण सगेसोयरे आणि सरसकट मराठा समाजासाठी ते आरक्षण मागत आहेत. सगेसोयरेची व्याख्याच घटनेत नाही. मग कसे ते आरक्षण मागतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Manorama Khedkar Video : “…म्हणून मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल काढले”, पूजा खेडकरंच्या वडिलांनी सांगितले धक्कादायक कारण

यावेळी शेंडगे यांनी मुंबईची नाकाबंदी करण्याचा इशारा जरी जरांगे यांनी दिला असला तरी या आंदोलनाच्या दबावाखाली जर सरकारने चुकीचा निर्णय घेतला तर ओबीसी समाजही गप्प बसणार नाही. आम्हीही आमच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli obc leader laxman hake said obc will have to bear huge cost if manoj jarange s demand fulfilled css