सांगली : चांदोली धरण परिसरात असलेल्या वारणावती (ता. शिराळा) येथे करमणूक केंद्रावर सोमवारी रात्री अजस्त्र अजगराचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारणावती वसाहत येथे मानवी वस्ती कमी झाली असून अनेक खोल्यांची पडझड झाली आहे. तसेच वनस्पतींची वाढही मोठ्या प्रमाणात झाली आहे.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांचा इशारा, “ड्रग्ज प्रकरणाचं विरोधकांनी राजकारण करु नये, अन्यथा..”
या परिसरात गवे, बिबट्या यांचाही वावर वाढला असताना सोमवारी रात्री रस्त्यावर आडवा पसरलेला अजगर काही नागरिकांच्या नजरेस पडल्याने घबराट पसरली आहे.
सांगलीतील चांदोली धरण परिसरात असलेल्या वारणावती (ता. शिराळा) येथे करमणूक केंद्रावर सोमवारी रात्री अजस्त्र अजगराचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. pic.twitter.com/l6T3IiLaYI
— LoksattaLive (@LoksattaLive) June 25, 2024
सुमारे पंधरा फूट लांबीचा हा अजगर रस्ता ओलांडत असताना काहींनी त्याची चित्रफितही तयार केली.