सांगली : पुण्यातील पार्टीला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगत १२ लाखाची खंडणी उकळण्याचा प्रकार सांगलीत घडला असून या प्रकरणी पाच जणाविरूध्द संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्तरमिया शेख (रा. सह्याद्रीनगर) यांना मोबाईलवर फोटो दाखवून तुम्हाला जिवे मारण्याची सुपारी पुण्याच्या पार्टीला दिली असल्याचे यासीन इनामदार (रा. हडको कॉलनी) याने सांगितले. सुपारी घेतलेल्या पार्टीची भेट घालून देण्यासाठी कराड येथे नेले. शेख आणि नातेवाईक यांची कराडमध्ये भेट घालून देण्यात आली.
हेही वाचा : सांगली: नवऱ्यावर करणी केल्याच्या संशयातून महिलेचा कुत्र्याकरवी चावा
जीव वाचविण्यासाठी त्यांनी ६० लाख रूपयांची खंडणी मागितली. यानंतर १७ मे रोजी शेख यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत १२ लाख रूपयांची खंडणी उकळली. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात इनामदार आणि चार अनोळखी अशा पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.