सांगली : रविवारी नांद्रे येथील धार्मिक मिरवणुकीसाठी आणलेला शेडबाळ मठाचा हत्ती वनविभागाने ताब्यात घेऊन माहुतावर वन गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ताब्यात घेतलेल्या हत्तीची सोमवारी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अद्याप कुपवाडमधील वनविभागाच्या ताब्यातच ठेवण्यात आला आहे. कर्नाटकातील शेडबाळ (ता.अथणी) येथील मठाचा हत्ती रविवारी नांद्रे (ता. मिरज) येथे आणण्यात आला होता. मिरवणुकीनंतर तो परत शेडबाळकडे ट्रकमधून नेत असताना प्राणीमित्रांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करण्याची विनंती वन विभागाला केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”

वसंतदादा कारखान्याजवळ वन विभागाच्या भरारी पथकाने तपासणी केली असता हत्तीच्या प्रवासाबाबत आवश्यक परवाना आढळून आला नाही. हत्तीच्या वापराबाबत आणि वाहतुकीविषयी कायदेशीर पूर्तता नसल्याचे आढळून आल्याने भरारी पथकाचे प्रमुख महंतेश बगले यांनी हत्ती ताब्यात घेउन कुपवाड येथील वन विभागाच्या कार्यालयात हजर केला. आज सकाळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्या प्रकरणी हत्तीच्या माहूतावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.