सांंगली : शास्त्रीय गायनात मृदू स्वरांची साथ देणार्या मिरजेतील सतार, तानपुरा या वाद्यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. पांरपारिकता व विशिष्ट गुणवत्तेच्या जोरावर हे मानांकन मिळाले असून यामुळे जागतिक पातळीवर या वाद्यांना चांगले मोल मिळणार आहे. याबाबत माहिती देताना बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले, वाणिज्य व उद्योग मंडळाच्या उद्योग प्रोत्साहन अंतर्गत व्यापार विभागातून मानांकन मिळाले आहे. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेने मिरज सितार व सोलटुन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या संस्थेने मिरज तानपुरा या वाद्यांचे मानांकन प्रस्ताव सादर केले होते. मानांकन मिळवण्यासाठी नाबार्ड, हस्तकला विभाग कोल्हापूर, उद्योग विभाग सांगली यांचे सहकार्य लाभले व पद्मश्री डॉ. रजनीकांत (जीआय) एक्स्पर्ट संस्थेच्या माध्यमातून हे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा