सांंगली : तंटामुक्ती अध्यक्षावर जीवघेणा हल्ला करणार्‍या संशयित तरूणाचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी घडली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दि.२९ जूनअखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्यावर सोमवारी रात्री कवलापूरातील सिध्ेदेश्‍वर मंदिराजवळ तीन तरूणांनी कोयत्याने हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. ही घटना समजताच गावातील लोक या ठिकाणी जमले. जमाव जमल्याचे दिसताच हल्ला करणार्‍या तरूणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. दोघे जण पळून गेले तर संकेत नरळे (वय १७) हा जमावाच्या ताब्यात सापडला. जमावाने घटनास्थळी बेदम मारहाण केल्यानंतर त्याला पुन्हा भानुदास पाटील यांच्या तुकाई मळ्यात नेउन पुन्हा मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला होता. पोलीसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना संकेतचा काल मृत्यू झाला.

हेही वाचा : ‘या’ तारखेपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारकऱ्यांनी दिलं महापूजेचं निमंत्रण

या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीसांनी महेश पाटील, गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडूरंग पाटील, पप्या पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, बंडा नाईक, विवेक उर्फ गोट्या पाटील, विशाल पाटील या ९ जणांसह अन्य सहा ते सात जणाविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येप्रकरणी रात्री उशिरा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. २९ जून अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अन्य संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा : “ब्रँड हा ब्रँड असतो, ब्रँडला कॉपी करणारे…”; यशोमती ठाकूरांच्या ‘त्या’ कृतीवर नवनीत राणांची प्रतिक्रिया

दरम्यान, मृत संकेत उर्फ शुभम नरळे यास मुला-मुलींना त्रास देत असल्याने पंडित नेहरू विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी त्याच्यावर कारवाई केली होती. ही कारवाई तंटामुक्ती अध्यक्ष पाटील यांच्या सांगण्यावरूनच केली असल्याचा राग धरून संकेत नरळे यांने मित्र राहूल माने व ज्योतीराम माने यांच्यासोबत येउन पाटील यांच्यावर हल्ला करण्याचे निश्‍चित करून नरळे व राहूल माने या दोघांनी धारदार कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला चुकविण्यासाठी लालासो पाटील यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हातावर कोयत्याचा घाव बसला असून तेही जखमी झाले आहेत. हल्लेखोरापैकी एक जण अल्पवयीन असून दोघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli suspect who attacked tantamukti president dies in mob attack css
Show comments