सांगली : आमदार अनिल बाबर यांचे व्याही सेवानिवृत्त मुख्याध्यापक पोपटराव जाधव यांच्या घरी अज्ञाताने चोरी करून तीन लाखाचा ऐवज लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मंगळवारी उशिरा विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोपटराव जाधव हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आपल्या पत्नीसह विट्यातील साळशिंगे रस्त्यावरील आपल्या घरात वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळी उठल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ विटा पोलीस ठाण्यास याची माहिती देण्यात आली. जाधव हे आमदार बाबर यांचे व्याही तर माजी नगरसेवक अमोल बाबर यांचे सासरे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वंचित आणि ठाकरे गटाची युती, मग प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत का नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले…

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या २० ग्रॅम वजनाच्या लहान अंगठ्या, २० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे दोन वेढण आणि रोख १ लाख ८५ हजार रूपये यांचा समावेश आहे. राहत्या घरी तिजोरीत हा ऐवज ठेवण्यात आला होता. रात्रीच्यावेळी अज्ञाताने खोलीला असलेल्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून हा माल लंपास केला. या प्रकरणी तक्रार दाखल होताच उपअधिक्षक पद्मा कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके हे करीत आहेत.