सांगली : देवाची गाणी म्हणून गुजराण करणाऱ्या तृतियपंथियानेच सोबत्याच्या घरातील सुवर्णलंकार चोरल्याची घटना उघडकीस आली असून मंगळवारी मिरजेत चोरी करणाऱ्या तृतियपंथियास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरलेले दीड लाखाचे २६ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “माढा, सातारा किंवा पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी”, राज्यातील कार्यकर्त्यांचा शरद पवारांना आग्रह

विटा येथील जयवंत बागडे याच्यासोबत देवाची गाणी म्हणून कैलास उर्फ कल्याणी जाधव हा तृतियपंथी गुजराण करत होता. त्याने बागडे याच्या घरातून सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संशयित जाधव आज मिरजेत आला असता पोलीसांनी पकडून झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये दीड लाखाचे चोरीचे दागिने सापडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli transgender arrested for 26 gram gold theft css
Show comments