सांगली : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून या निमित्ताने आगामी निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. अक्षता कलशाची गावोगावी मिरवणुक निघाल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीने आता मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहुर्त साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मिरज शहरात पालकमंत्री सुरेश खाडे यांनी अयोध्येतील राममंदिराची प्रतिकृती तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात उभारण्यास सुरूवात केली असून ही प्रतिकृती २० हजार चौरस फुटावर उभारण्यात येत आहे. या प्रतिकृतीची उंची ६३ फूट असून २२ शिखरे व एक कळस उभारण्यात येत आहे. या निमित्ताने सलग आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर भाजप व जनसुराज्य या पक्षाच्यावतीने श्रीरामाची ९० फूटी रांगोळी साकारण्यात येत असल्याची माहिती भाजपचे विधानसभा प्रमुख प्रा. मोहन वनखंडे, पश्‍चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखर इनामदार, जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांनी दिली.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray rally in thane
ठाणे हे खोक्याचे केंद्र – उद्धव ठाकरे
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

हेही वाचा : संदीप-सलील यांचं ‘हृदय में श्रीराम है’ गाणं देवेंद्र फडणवीसांनी केलं पोस्ट म्हणाले, “अत्यंत भक्तिमय…”

चार दिवसाच्या कार्यक्रमात आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा, दीपोत्सव, महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे भाजपकडून श्रीरामलल्लाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्सव स्थानिक पातळीवर आयोजित केल्यानंतर काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडूनही सांगलीतील कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. दि. २१ जानेवारी रोजी श्रीराम टेकडीपासून शोभायात्रा काढून प्रतिकृती मंदिरामध्ये श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

हेही वाचा : “खोके म्हणणाऱ्यांच्याच घरीच खोके…”, ठाकरे गटाच्या नेत्यांवरील कारवाईवर गुलाबराव पाटील यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लामपूरमध्ये लाल चौकातील महादेव मंदिरामध्ये ३ हजार महिला तिरंगी साड्या परिधान करून महाआरती करणार आहेत. तर भाजपच्यावतीने शहरात दि. २२ जानेवारी रोजी महाआरती व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरात विद्युत रोषणाई व भगवे ध्वज, भगव्या पताका लावून शहर भगवेमय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.