सांगली : तासगाव तालुक्यातील तमाशा कलावंत हिराबाई शामराव कांबळे बस्तवडेकर (वय ९३) यांना महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पारंपारीक तमाशाचे आद्य प्रसारक तात्या सावळजकर यांचेनंतर १९६० ते १९९२ पर्यंत जयवंत सावळजकरसह शामराव पाचेगांवकर यांच्या तमाशात पारंपारीक गायिका, नृत्यांगणा आणि अनेक वगनाट्यातील प्रमुख भूमिका शामराव पाचेगांवकर यांच्या पत्नी हिराबाई कांबळे बस्तवडेकर यांनी साकारल्या होत्या.
हेही वाचा : ..आणि मोदींचा कंठ दाटून आला, “लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर…”; सोलापुरात पंतप्रधान भावूक
पती शामराव पाचेगांवकर यांच्या निधनानंतर हिराबाई यांनी आपली मुले जयसिंग, लता आणि लंका यांना पारंपारिक कलेत पारंगत केले . हिराबाई यांनी राजा हरीचंद्र, चंद्रकेतु मुबारक, चंद्रमोहन, लाला पठाण, पाथर्डीचे राजे, कहाणी सत्यवतीची, पुनर्जन्माची महती, जीवंत मुलगी अशा अनेक वगनाट्यातील प्रमुख भुमिका साकारल्या होत्या. नायिकेची भूमिका साकारतांना वगांच्या टाक्या (म्हणणी) त्या स्वतःच्या पहाडी आवाजात सादर केल्या होत्या. पारंपारिक तमाशाचा बाज ठेऊन त्यांची मुले आजही कला सादर करत आहेत.