सांगली : लाडकी बहिण म्हणून शासकीय मदत मिळविण्यासाठी लागणारे दाखले संकलित करण्यासाठी तलाठी कार्यालयात महिलांची झुंबड उडाली असून याचा फायदा घेउन मोठ्या प्रमाणावर दलालाकडून सामान्य महिलांची लुबाडणूक सुरू आहे. प्रशासनाने अर्ज केल्यानंतर ४८ तासात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले जात असले तरी मुदतीत दाखले मिळतीलच याची शाश्‍वती नसल्याने महिला वर्ग अस्वस्थ झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाने २१ ते ६० वयोगटातील महिलांना मासिक १५०० रूपये देण्याची लाडकी बहिण योजना जाहीर केली असून यासाठी उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, आधार कार्ड, जन्मतारीख दाखला आदी कागदापत्रासह संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची १५ जुलै ही अंतिम तारीख दिली आहे. कालपासून ही अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी पहिल्या दिवशी बहुसंख्य महिलांना याची माहिती नव्हती. मंगळवारपासून मात्र, तलाठी कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी झुंबड उडाली आहे.

हेही वाचा : विधान परिषदेनंतर पंकजा मुंडेंना आता मंत्रिपदही मिळणार? स्वतः प्रतिक्रिया देत म्हणाल्या…

या संधीचा फायदा घेत अनेक दलाल कार्यरत झाले असून प्रति दाखला २० रूपये दर असताना निकड पाहून मनमानी दर आकारणी करून मध्यस्थ मालामाल होत आहेत. या शिवाय अर्ज भरून देण्यासाठी प्रत्येकी पन्नास रूपये दर आकारण्यात येत आहे. अनेक महिला साक्षर असूनही चुकीमुळे मिळणारी मदत नाकारली जाण्याचा धोका स्वीकारण्यास तयार नाहीत. यामुळे मागणी अर्ज लिहून देणार्‍यांचीही या परिसरात गर्दी झाली आहे. दाखल्यासाठी महिलांच्या रांगा सकाळपासूनच लागल्या होत्या.

हेही वाचा : “लाडकी बहीण योजना म्हणजे माहेरचा आहेर”; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “या योजनेचा लाभ…”

मिरज शहरात महापालिका विभागीय कार्यालयाच्या आवारात टाउन हॉलमध्ये तलाठी व मंडल कार्यालय आहे. या ठिकाणी दाखले मिळविण्यासाठी महिला वर्गाची झुंबड उडाली. दाखले मिळविण्यासाठी येणार्‍यांच्या वाहनामुळे मुख्य मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी तर होतच आहे. यामुळे महापालिकेचे मुख्य प्रवेशदार बंद करण्यात आले होते. तसेच तांदळ मार्केटमधून जाणारा रस्ता हा शहरातील मुख्य रस्ता असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli woman crowd at outside talathi office for ladki bahin yojana document css