सांगली : रक्षाबंधनापुर्वीच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची ओवाळणी बँक खात्यावर जमा झाल्याने सांगलीच्या बहिणीने मुख्यमंत्र्यांना मंगळसूत्राची राखी पाठवून कृतज्ञता व्यक्त केली. शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता काही महिलांच्या खात्यावर जमा होण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. आपल्या खात्यावर पैसे जमा झाल्याची खात्री करण्यासाठी बँकेत महिलांची गर्दी दिसत आहे. पैसे जमा झाल्याने बहुसंख्य लाडक्या बहिणी खूष झाल्या आहेत.

हेही वाचा : Anjali Damania : “तुमचं राजकारण संपवणार”, अंजली दमानिया अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत; म्हणाल्या, “त्यांचं उत्पन्न…”

पैसे बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे पाहून सांगली-मिरज रोडवरील बेथेलहेम नगर मध्ये राहणाऱ्या स्टेला दास सकटे या महिलेने मंगळसूत्राची राखी बनवून ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही मंगळसूत्राची राखी बनवून या महिलेने दिली आहे. ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे.

Story img Loader