वाई : खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील विजयी रॅलीमध्ये कार्यकर्त्याच्या गळयातील सोनसाखळी चोरट्याकडून २७ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी हस्तगत केला. दि ४ जून रोजी उदयनराजे भोसले यांच्या विजयी रॅलीमध्ये कार्यकर्त्यांच्या गळयातील सोन्याच्या चेन चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी सातारा बस स्थानक परिसरामध्ये सापळा लावून पोलीस अभिलेखावरील बाबासाहेब महादेव गायकवाड ( येळी ता. पाथर्डी जि.अहमदनगर), रामदास सोमनाथ घुले (माळेगाव चकला ता. शिरुर), सचिन काळू पवार (आनंदनगर ता. पाथर्डी), नितीन शिवाजी धोत्रे (नाथनगर ता. पाथर्डी) , अर्जुन लक्ष्मण मासाळकर (रा. वाळूज ता. पाथर्डी) यांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपूस केली असता त्यांनी सातारासह फलटण येथील चार गुन्हे उघड करुन चालू बाजारभावा प्रमाणे २०लाख ६६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, १२ हजार रुपये रोख, रक्कम, ७ लाख रुपये किमतीची गुन्हा करण्यासाठी वापरलेली जीप असा एकूण २७लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला.पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी याबाबत कारवाईच्या पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर यांना दिल्या होत्या.सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, अजित कर्णे, अमित सपकाळ आदींनी कारवाई केली.