वाई : खासदार उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील विजयी रॅलीमध्ये कार्यकर्त्याच्या गळयातील सोनसाखळी चोरट्याकडून २७ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सातारा पोलिसांनी हस्तगत केला. दि ४ जून रोजी उदयनराजे भोसले यांच्या विजयी रॅलीमध्ये कार्यकर्त्यांच्या गळयातील सोन्याच्या चेन चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी सातारा बस स्थानक परिसरामध्ये सापळा लावून पोलीस अभिलेखावरील बाबासाहेब महादेव गायकवाड ( येळी ता. पाथर्डी जि.अहमदनगर), रामदास सोमनाथ घुले (माळेगाव चकला ता. शिरुर), सचिन काळू पवार (आनंदनगर ता. पाथर्डी), नितीन शिवाजी धोत्रे (नाथनगर ता. पाथर्डी) , अर्जुन लक्ष्मण मासाळकर (रा. वाळूज ता. पाथर्डी) यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सलग दुसरा धक्का, राजेंद्र यादव गटाच्या भाजपप्रवेशाने मलकापूरात काँग्रेसला मोठे खिंडार

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara 27 lakh 78 thousand recovered from the gold chain thief who stolen chains in udayanraje s rally css
First published on: 26-06-2024 at 22:16 IST