सातारा: दहा वर्षीय अल्पवयीन मुलीस धाक दाखवून पन्नास वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने म्हसवड (ता. माण) पोलीस ठाण्यात आज फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने महादेव विठोबा जाधव (भालवडी, काळंगेगोटा ता.माण) यास अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार यांनी दिली.
हेही वाचा : राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
संशयिताने गुरुवारी दुपारी घरी कोणीही नसताना पीडित मुलीच्या घरी अत्याचार केल्याची फिर्याद मुलीच्या आईने आज म्हसवड पोलीस ठाण्यात दिली. म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार यांनी तत्काळ संबंधित संशयित जाधव यास अटक केली.