वाई: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात ६४ वैद्यकीय अधिकारी, ५३६ आरोग्य कर्मचारी, ३९ रुग्णवाहिका, १७ आरोग्य दूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय २१ वैद्यकीय पथकेही तैनात असणार आहेत. एक हजार ४० आंतररुग्ण खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर ७२ कक्ष उपलब्ध करण्यात आले आहेत. पालखी सोहळा उत्साहात, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे अशा सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालखी सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री. देसई यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, उपवन संरक्षक अदिती भारद्वाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, फलटण व खंडाळ्याचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्यासह सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा