सातारा : गणेशोत्सवात आणि मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण आणि घातक प्रकाशझोतांच्या वापरावरील बंदी झुगारणारे तसेच तडीपार आदेश असतानाही शहरात दिसल्याप्रकरणी आतापर्यंत ५८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव कालावधीमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदूषण यंत्रणेचा वापर करुन ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचे समोर आले. त्यानुसार एकूण २० ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांना व धारकांविरुद्ध उपविभागीय अधिकारी सातारा प्रस्ताव पोलीस यांच्याकडे देवून ते पुढे न्यायालयाकडे खटले पाठण्यात आले आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्या मंडळांनी घातक प्रकाशझोतांचा वापर केला त्यांनाही कारवाईचा दणका देण्यात आला. एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सव कालावधीमध्ये कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ९७ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले होते. या तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी १० दिवसात ३० जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना तडीपारी व त्याचे उल्लंघन केल्याचा असे तिहेरी दणका दिला. या सर्व कारवाया पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे (डीबी) सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलिस देशमुख, राहुल घाडगे, विश्वनाथ मेचकर, दीपक इंगवले, सुजित भोसले, नीलेश यादव, नीलेश जाधव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, सुशांत कदम, इरफान मुलाणी, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सचिन रिटे व गोपनिय विभागाने केली.