वाई : महाबळेश्वर पाचगणी गिरीस्थानांवर आज ढग उतरल्याचा अनुभव पर्यटकांनी घेतला. थंडीचा कडाका वाढला असून आज पारा घसरला आहे. वेण्णा लेक आणि टेबल लॅन्डसह दोन्ही शहरे धुक्यात हरवली आहेत. आज सकाळ पासून कमी सूर्यप्रकाश, धुक्याची दुलई आणि थंडीचा कडका पर्यटक अनुभवत आहेत. महाबळेश्वर पाचगणीला आलेल्या पर्यटकांना आज एकदम नवा अनुभव आला. सकाळी पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले असता वेण्णा लेक परिसरात एकदम ढग उतरल्याने स्वर्गसुखाचा अनुभव पर्यटकांनी घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाशिक महानगरपालिकेत प्रशासन-राजकीय संघर्षाचा नवीन अंक, माजी महापौरांचीही उडी

सर्वत्र दाट धुके होते. अशीच परिस्थिती पाचगणी शहरातही दिसून आली. पाचगणी शहरावरही टेबल लँड वरून ढग उतरल्याचे दिसून आले. दोन्ही शहरांवर ढग उतरल्यामुळे एकदम भन्नाट दृश्य दिसून आले . पर्यटक वातावरणातील बदलाचा आनंद घेत आहेत. पर्यटकांना महाबळेश्वर, पाचगणीमध्ये आज सकाळी जणू ढगच जमिनीवर आल्याचा भास होत होता. धुक्याची दुलई पसरलेली होती. रोमँटिक वातावरण, धुक्याची दुलई, ढगच जमिनीवर असल्याचा अनुभव पर्यटक घेत होते. सध्या पाचगणी महोत्सव (फेस्टिव्हल)ची धामधूम सुरु आहे. हा नजारा पाहून पर्यटक एकदम खुश झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara at mahabaleshwar clouds on mountains view experienced by the tourists css