सातारा: शरद पवारांनी माण खटावसाठी काय केले हे जाहीरपणे सांगावे, असे आव्हान भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांना दिले. समाजात द्वेष पसरवून चुकीची आणि समाज विघातक वक्तव्य करून राजकारण करण्याचा शरद पवार यांचा हातखंडा आहे. माण खटाव मध्ये कधी उरमोडी, जिहे कटापूरच्या पाणी प्रश्नावर ते बोलले नाहीत. त्यांनी या भागात एकही मोठे काम केले नाही. त्यांना फक्त माझा पराभव करायचा आहे. त्यांनी पंधरा वर्षात येथील जनतेसाठी काय केले हे जाहीरपणे सांगावे असे आव्हान जयकुमार गोरे यांनी दहिवडी (ता माण) येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बारामतीतून सांगावा आला की सगळे माझ्या विरोधात एकत्र येतात. माझ्या विरोधात जनतेला न पटणारे खोटे ठरवून आलेले सांगतात. काहीही केले तरी खटाव-माणची जनता मी १५ वर्षात काय केले आहे, हे त्यांना सांगण्याची गरज नाही. विरोधकांकडे विकासकामे, पाणीप्रश्नावर निवडणूक लढविण्याचा कोणताच अजेंडा आणि व्हिजन नाही. त्यांचा तो आवाकाच नसल्याने जयकुमारच पुन्हा आमदार होतील, असे ते खासगीत सांगत आहेत.

Ajit Pawar On Sunil Shelke
Ajit Pawar : “प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा, अजित पवारांनी भर सभेत टोचले कान; म्हणाले, “जरा…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
uddhav thackeray News
Uddhav Thackeray : “गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त १५००?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
Jagan Mohan Reddy
Tirupati Laddu Row : “आधी धर्म सांगा मग तिरुपतीचं दर्शन घ्या”, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती दर्शनाचा बेतच रद्द केला
manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!
gulabrao patil on sanjay raut
Gulabrao Patil: “संजय राऊत अपना माल, अन् उद्धव ठाकरे…” गुलाबराव पाटलांची टोलेबाजी
Lure of job in ISRO, Lure of job in NASA,
नागपूर : इस्र, ‘नासा’मध्ये नोकरीचे आमिष; ६ कोटींनी फसवणूक
Chhagan Bhujbal on Manoj
Chhagan Bhujbal : “आंतरवालीतून जरांगे पाटील निघून गेले होते, रोहित पवारांनी…”, छगन भुजबळांचा दावा!

हेही वाचा : “भाजपाला लोकांना फक्त वेड्यात काढायचं आहे”; वाघनखांवरून जितेंद्र आव्हाडांचं राज्य सरकारवर टीकास्र; म्हणाले…

विधानसभा निवडणूक आली की ते अनेकांना चावी देतात. विरोधकांकडे निवडणूक लढण्याचा उद्देशच नाही. त्यांना फक्त माझा पराभव करायचा आहे. त्यांनी १५ वर्षात जनतेसाठी काहीच केले नाही. त्यांची माझ्यावर बोलायची पात्रताच नाही, असे गोरे म्हणाले. लवकरच माण तालुक्यातील रिक्त पाणी योजनांचे भूमिपूजन करत असल्याने पाणी प्रश्नावर ही माझी शेवटची निवडणूक असेल असेही गोरे यांनी सांगितले.

हेही वाचा : सत्तेतील लोकांची भूमिका शपथेशी विसंगत यामुळे परिवर्तन अटळ- शरद पवार

मराठा समाजाला आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. पोलीस भरतीतही आरक्षण आहे. मात्र ते सतत खोटे बोलत आहेत. दलित आणि मुस्लिम बांधवांचा यांनी खोटे बोलून समाजात द्वेष परविण्याचे काम केले. कोणीही जनतेला माझ्या विरोधात कितीही खोटे सांगितले. कोणी काहीही केले. तरी यावेळी पुन्हा मीच आमदार होणार आहे असे ते म्हणाले.