सातारा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी व रक्षाबंधनासाठी साताऱ्यातील दरे (ता. महाबळेश्वर) या आपल्या गावच्या दौऱ्यावर रात्री उशिरा येणार आहेत. मुख्यमंत्री आज सोमवारी दुपारी हेलिकॉप्टरने दरे येथे येणार होते. मात्र हवामानातील बदलामुळे व पावसाळी वातावरणामुळे सायंकाळपर्यंत हेलिकॉप्टर साताऱ्यात पोहोचू शकत नाही, असा अहवाल आल्यानंतर त्यांनी मुंबईतील आपले कार्यक्रम सुरू ठेवले. सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानाने पुणे येथे येणार आहेत. यानंतर वाहनाने रस्ते मार्गे रात्री उशिरा दरे गावी पोहोचणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांनी नवाब मलिकांच्या मुलीवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
मुख्यमंत्री गावच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त व सर्व शासकीय यंत्रणा सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या गावी पोहोचली आहे. दुपारी साडेतीनपर्यंत मुख्यमंत्री येणार असल्याने दुपारपासून सर्व यंत्रणा त्यांच्या प्रतीक्षेत होती. मात्र सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री न आल्यामुळे पुढील चौकशीकरिता हवामान बदलामुळे मुख्यमंत्री पुण्याहून रस्त्याद्वारे वाई, पाचगणी, महाबळेश्वरमार्गे गावी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा किमान दोन दिवसांचा दौरा असणार आहे. नंतर सोयीप्रमाणे ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
© The Indian Express (P) Ltd