वाई : जोर खोऱ्यातील कृष्णा नदीवर बलकवडी धरणात तब्बल २४ वर्षांपूर्वी पाण्याच्या फुगवंट्यात बुडालेली शिवकालीन मंदिरे अवशेष पाणी तळाला गेल्याने पाहण्यासाठी खुली झाली आहेत.ती पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी होत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे बलकवडी धरण रिते झाल्याने २५ वर्षांपूर्वीच्या वैभवाच्या पाऊलखुणा उघड्या झाल्या आहेत. धरण क्षेत्रातील जोर, गोळेवाडी गावातील काही मंदिरे उघडी झाली . हा ठेवा पाहण्यासाठी पुनर्वसित ग व परिसरातील गर्दी केल्या. यावेळी पाण्यामध्ये लुप्त झालेली घरे, मंदीर, गावाचे बुरुज पहिल्याने लोकांना गहिवरून आले तर काहींनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : ‘गुलाम जास्त आवाज करत नाहीत, शिंदे आणि अजित पवार आश्रित राजे’ – संजय राऊत

सध्या धोम-बलकवडी धरण कोरडे पडले. सगळीकडे चिखल, दलदल आणि गाळ. काही ठिकाणी उभी असलेले वाळके वृक्ष. विराण दिसणाऱ्या या भूमीत चिरेबंदी दगडातले एक हेमाडपंथी मंदिर आजही जसेच्यातसे उभे असलेले दिसते. २५ वर्षे पाण्याखाली असूनही आकाशात झेपावणारा या मंदिराचा देखणा कळस लक्ष वेधून घेत आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या उगमाजवळच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष आहे. ”धुरेश्वर’ हे कृष्णेच्या काठावरचे पाहिले शिवमंदिर आहे. अत्यंत आखीव रेखीव, संपूर्ण घडीव काळ्या दगडांचे, सुबक नक्षीकाम केलेले भव्य मंदिर. मोठमोठे दगड एकावरएक रचून बांधलेले आकर्षक गोपूर आणि त्यावर दगडाचाच कोरलेला कळस. मन मोहून टाकणारे हे मंदिर भूतकाळातल्या समृद्ध गोकर्णेश्वर मंदिर उघड्यावर आले.वास्तुशिल्प कलेची साक्ष देते. पाहतच राहावं असं देखणं ‘शिल्प’ आहे.

हेही वाचा… रायगड : मुंबई गोवा महामार्गावर दरडींची टांगती तलवार, रुंदीकरणाच्या कामामुळे दरडींचा धोका वाढला

आता हे मंदिर उघडले पण काही गाळ भरलाआहे. दरवाजा अर्धा उघडा आहे पण आत चिखल असल्यामुळे मंदिरात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे गाभाऱ्यातल्या देवाचे दर्शन होत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले.

धुरेश्वरापासून जवळच पुढे अगदी नदीपात्रात ‘गोकर्णेश्वर’ आहे. हे मंदिरही अत्यंत सुंदर असून हे मंदिरही उघडे झाले आहे. पण आजूबाजूला दलदल असल्यामुळे लोकांना तिथपर्यंत जाता आले नाही. धोम धरणात बुडालेल्या खावली येथील नवलाई मंदिराची भव्य कमान इतिहासाची साक्ष देत आजही अशीच उभी आहे. संपूर्ण चिरेबंदी दगडी कमान आणि त्यावर विटांचे बांधकाम असलेला नगारखाना. ही कमान पाण्याखाली जाऊन आता ४५ वर्षे होऊन गेली आहेत. पण आजही जशीच्यातशी असल्याचे यंदा दिसून आले.