सातारा: मागील काही दिवसांत जोर खोऱ्यात झालेल्या अतिवृष्टीने रस्ते, शेती वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाई तालुक्याचा जनसंपर्क तुटला आहे. जोर गोळेवाडी जाधव वस्ती व इतर पश्चिम भागांतील रस्त्यांची अवस्था फार भयावह झाली आहे. आमदार मकरंद पाटील यांनी सर्व यंत्रणांना परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाकडून भर पावसात युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीला सुरूवात झाली आहे.

मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार अतिवृष्टीने जोर खोऱ्यातील रस्ते वाहून गेले. जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते भात, नाचणीची शेतेही वाहून गेली. यामुळे या परिसराचा वाई तालुक्याशी जनसंपर्क तुटला. सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाकडून भर पावसात युद्धपातळीवर मोठ मोठ्या यंत्रसामुग्रीद्वारे रस्ते दुरुस्तीला सुरूवात करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जोर गोळेवाडी जाधव वस्ती व इतर पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था फार भयावह झाली आहे. काही घरांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागाचा वाई तालुक्यातील संपर्क तुटलेला आहे.

Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Two brothers drowned, Nandurbar taluka,
नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू
Youth died, Par river flood, Nashik,
नाशिक : पार नदीच्या पुरात वाहून युवकाचा मृत्यू
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?
Sindhudurg, Fishing boat accident,
सिंधुदुर्ग : मासेमारीला गेलेली नौका दुर्घटनाग्रस्त, तिघांचा बुडून मृत्यू

हेही वाचा : साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालय इमारतीला गळती

आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजय परीट, आरोग्य अधिकारी संदीप यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश गोंजारी व जलसंपदा विभागाला ताबडतोबिने परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तात्काळ या गावांचा वाई तालुक्याशी संपर्क जोडून देण्याची सूचना केली आहे. आमदार पाटील रविवारी या भागाचा दौरा करणार आहेत. जोर गोळेवाडी जाधव वस्ती व इतर संपर्क तुटलेल्या पश्चिम भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांची व मुंबई येथे या विभागाच्या सचिवांची रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश गोंजारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी काम सुरू आहे.