वाई : साताऱ्यातील ठोसेघर या समृद्ध वन व निसर्गसंपदा लाभलेल्या परिसरात ‘फडफड्या टोळ'(हुडेड ग्रासहॉपर) आढळून आला आहे. हा कीटक सह्याद्रीत आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. हा एक छोटासा आकर्षक रंगसंगती, पाठीवर उंचवटा, त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी, पांढरे डोळे असणारा कीटक त्याच्या सौंदर्यामुळे अधिकच सुंदर भासतो. सध्या साताऱ्याला सर्वत्र मागील पंधरा-वीस दिवसात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे परिसर दुर्मिळ गवत, पाने फुले फुलायला सुरुवात झाली आहे.
निसर्गाच्या नव्या बदलात ही आढळून आलेल्या फडफडया टोळ (हुडेड ग्रासहॉपर) हा एक सर्वसामान्य किटकांपेक्षा भिन्न दिसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी तो नेहमीच कुतूहलचा विषय ठरतो. पानांशी एकरूप होणारा रंग अन् पाठीवरील उंचावट्यामुळे त्याला इंग्रजीत ‘हुडेड ग्रासहॉपर’ असे नाव ठेवण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव ‘टेराटोड्स मॉन्टिकोलीस’ असून या कुळातील किटकांना हुडेड ग्रासहॉपर म्हणून ओळखले जाते. हा गवतटोळ्यांचा एक वंश आहे जो भारत आणि श्रीलंका येथे आढळतो.
हुडेड ग्रासहॉपर गवताळ प्रदेश तसेच वन परिसंस्थेचा एक महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जात होता. त्यांच्या लोकसंख्येचा अतिरेक आणि विशेषतः पिके आणि वनस्पतींवरील वनस्पतिभक्षी स्वभावामुळे त्यांना दुष्काळाचे कारण मानले जात होते. ठोसेघर परिसरात ‘नुकतेच हुडेड ग्रासहॉपरचे दर्शन घडल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला. पानांशी एकरूप होणारा रंग, पाठीवरचा उंचवटा, त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी हुडेड ग्रासहॉपरला अधिक सुंदर बनतो.
हुडेड ग्रासहॉपर हा तसा शास्त्रीय दृष्ट्यान दुर्मीळ कीटक आहे असे नाही पण तो. तितका सामान्यही नाही. बहुतांश ठिकाणी याचा अधिवास आढळतो. पानांशी एकरूप होणारा रंग व पाठीवरील उंचवट्यामुळे तो सर्वांत वेगळा ठरतो. हा कीटक टेराटोड्स मॉन्टिकोलीस असून, या विषयी भारतातील काही संशोधक संशोधन करीत आहेत. टेराटोइस वंश ॲक्रिडिडे कुटुंबात येतो आणि या वंशात ब्रेकिप्टेरस, मॉन्टिकोलीस आणि फोलिटस या तीन प्रजातींचा समावेश आहे. -अमित सय्यद, संशोधक