सातारा: पुणे -बंगळुरू महामार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवार -रविवार सलग दोन दिवस सुट्टी आणि दिवाळी नंतर गावाकडून पुण्या मुंबई निघालेली पर्यटक चाकरमानी यामुळे ही महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, वाहनांच्या रांगाच -रांगा दिसत आहेत, याचा मोठा फटका हा वाहनधारकांना बसत आहे. पुण्या-मुंबई कडून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांमुळे खंबाटकी घाटात वाहतूक संथ असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या असून, घाट पूर्णपणे जाम झाला आहे. पहाटेपासूनच घाट जाम झाला आहे.
दिवाळी सुट्टीनंतर चाकरमानी गावा कडून निघाल्यानं या महामार्गावर वाहतूक वाढली, त्यामुळे पुणे- बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका मार्गावरील मालट्रक अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना देखील बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील वाहतूक प्रचंड धिमी झाली आहे.
हेही वाचा : Breaking: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची निवडणूक आयोगाकडून बदली; मतदान १५ दिवसांवर असताना मोठी घडामोड!
रविवार पासूनच मुंबई-पुणेकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमध्ये चाकरमानी अडकले असून वाहतूक कोंडीची समस्या आणखी डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या महामार्गावर वाहनांच्या ६ ते ७ किमीपर्यंत रांगा लागल्या असून साधारण एक ते दिड तासापर्यंत वाहने जागीच ठप्प असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा : Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात आले असून सेवा रस्त्यावरूनही वाहतूक वळविण्यात आली आहे . त्याचबरोबर सध्या महामार्गावर हलक्या वाहनांना रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात येत आहे. परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसे आणखी वाहतूक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.