वाईः सातारा मतदारसंघातील प्रचारात सध्या स्थानिक प्रश्नांपेक्षा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्याचा मुद्दाच जास्त तापवला जात आहे. याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर नव्याने दाखल झालेला गुन्हा नुकतीच तीन संचालकांवर झालेली कारवाई आणि साताऱ्यातील पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर झालेले आरोप यामुळे हा प्रश्न सध्या प्रचारात ऐरणीवर ठेवण्याचा प्रयत्न भाजपचे उमेदवार उदयनराजे करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा शौचालय घोटाळा आहे. २०१४ पूर्वीच्या असलेल्या या प्रकरणात आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव आरोपांच्या भोवऱ्यात सुरुवातीपासून होते. आता त्यांना पवार गटाकडून साताऱ्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या आरोपांना आता प्रचाराच्या मुद्द्याचे स्वरूप आले आहे.

हेही वाचा : सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “कुणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर…”

सध्या साताऱ्यातील प्रत्येक गावोगावी प्रचारात हाच मुद्दा चर्चेत राहील असा प्रयत्न होत आहे. प्रचारातील भाषणातही नेत्यांकडून या भ्रष्टाचारावर जोर दिला जात आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडींचे नेते नरेंद्र पाटील आणि स्वतः उदयनराजे भोसले यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन माध्यमांनी यावर आवाज उठवत शशिकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara lok sabha election 2024 bjp udayanraje bhosale and shashikant shinde s politics on mumbai apmc scam css