वाई : मराठा आरक्षणासाठी दौऱ्यावर असणारे मनोज जरांगे-पाटील यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. दोघांनीही त्यांचे स्वागत केले. सातारा येथे गांधी मैदानावर आज शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी सभा झाली. यावेळी सातारकरांनी त्यांचे मोठे स्वागत केले. या सभेस खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित नव्हते. मात्र त्यांचे कार्यकर्ते सहभागी होते. सभेनंतर जरांगे पाटील यांनी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली.

मनोज जरांगे पाटील यांनी खासदार उदयनराजे यांच्या निवासस्थानी जलमंदिर पॅलेस या ठिकाणी भेट घेऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना कानमंत्र देण्यात आला. यावेळेस खासदार उदयनराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना चांदीची तलवार व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प भेट दिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प भेट दिले.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट
Rohingya house in Pune
Rohingya in Pune: रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर, भारतीय पासपोर्टही मिळवले
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर

हेही वाचा : “…तर आम्ही शांत बसणार नाही”, नरेंद्र पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

यावेळी उदयनराजे म्हणाले,आज प्रत्‍येकजण म्‍हणतोय. आम्‍ही इतके. आम्‍ही एवढे. हे टाळायचे असेल आणि सर्वांना न्‍याय, अधिकार मिळायचा असेल तर जातीनिहाय जनगणना आवश्‍‍यक आहे. ती झाली कि देऊन टाका ज्याच त्‍याला जे पाहिजे ते. कशाला वाद. मी हात जोडुन सगळ्यांना विनंती करतो. काय ते प्रश्‍‍न मिटवा, नाहीतर देशाचे तुकडे होतील, वाट लागायला वेळ लागणार नाही. मी कुणाचेही समर्थन करत नाही. मनोज जरांगे आरक्षणासाठी मरायला तयार झालेत. का, कशासाठी. का तर अन्‍याय झालाय म्‍हणून. जनगणना करा. कोणावरही अन्‍याय करु नका, असे माझे म्‍हणणे आहे. जनगणना करा आणि आवश्‍‍यक आहे, त्‍याला आरक्षण द्या, असे ते म्हणाले.

हेही वाचा : सीओपीडी श्वसन विकार मृत्यूचे कारण ठरणारा जगातील तिसरा आजार – डॉ. अनिल मडके

आम्ही कोणाचे तरी काढून आम्हा मराठ्यांना आरक्षण द्या, असे आजपर्यंत म्हटलेले नाही. आमच्या हक्काचं‌ आम्हांला मिळावं ही भूमिका आमची आहे. ज्येष्ठ मंडळींनी समाजात तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेऊ नये असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान आरक्षणावरुन समाजा-समाजात कोणी तेढ निर्माण करत असेल तर संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला आमचे समर्थन असेल असेही त्यांनी नमूद केले. मनोज जरांगे पाटील हे लोकशाहीतील योद्धे असल्याचे कौतुक शिवेंद्रराजेंनी केले.संपुर्ण राज्य त्यांनी हादरवलं. कुंभकरणाच्या झोपेतुन जागं करण्याचं काम मनोज जरांगे यांनी केलं आहे. आमच्या हक्काचं‌ मिळावं ही आमची मागणी असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. यावेळी मराठा बांधव उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या वतीनेही जरांगेंचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader