सातारा: छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर मंगळवारी रात्री ३६५ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी… जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी हा प्रज्वलित सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.

प्रतापगडवासिनी भवानीमातेच्या मंदिरास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महोत्सव सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी नवरात्रोत्सवात मशाल महोत्सव साजरा केला जात असून, यंदा या महोत्सवाचे १५ वे वर्षे आहे. मंगळवारी रात्री भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री पारंपरिक वाद्यांचा गजर व जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात मशाली करण्यात आल्या. भवानीमाता मंदिरापासून किल्ल्याच्या बुरुजापर्यंत पेटविण्यात आलेल्या माशालींनी गड व परिसर उजळून निघाला. किल्ल्याच्या चहुबाजूंनी करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे किल्ल्याचे सौंदर्य उजळून निघाले. गडावर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
blast at IOC plant gujarat
गुजरात: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या!
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Srikant Shinde road show in front of Shiv Sena Bhavan to campaign for Sada Saravankar Mumbai
शिवसेना भवनसमोरून सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांचा रोड शो; महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

हेही वाचा : Islampur Assembly Constituency: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व; महायुतीत इस्लामपूरची जागा कोणाला मिळणार?

किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात. एक घट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, कारण शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याचबरोबरच गेल्या १५ वर्षांपासून गडावर मशाल महोत्सवही साजरा केला जात आहे. ३६५ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी… जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी हा प्रज्वलित केला.