वाई : बावधन नाका (ता वाई) येथील पोलीस अभिलेखावरील गुन्हेगाराकडून तीन गावठी पिस्टल, दोन गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळया, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा सहा लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अविनाश मोहन पिसाळ असे आरोपीचे नाव असून स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा, वाई पोलीस व वनविभाग अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने हि कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अविनाश मोहन पिसाळ याच्याकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल आहे. तसेच त्यास शिकारीचा छंद असून त्याच्याकडे वन्यजीव प्राण्यांचे अवयवही आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक रविंद्र भोरे, उपनिरक्षक अमित पाटील, वाई पोलीस अधिकारी व वनविभाग वाई येथील स्नेहल मगर आणि अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकुन गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, २ गावठी कट्टे, ७८ जिवंत काडतुसे, ३७० वापरलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळया, २ तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा सहा लाख २० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा : “३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या”; सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांवर राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो केवळ तोंडी…”

कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वीही आरोपीवर वाई पोलीस ठाण्यात शस्त्रअधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळोवेळी अविनाश पिसाळ याला तपासकामी ताब्यात घेतले होते पण प्रकृतीचे कारण देऊन त्याने सुटका करून घेतली होती. यावेळी स्थनिक गुन्हे शाखेने त्याला संधीच दिली नाही. त्यामुळे त्याच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत नव्याने काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.