वाई : जातीच्या दाखल्यात फेरफार केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात महिलेवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्काबाई हणमंत विटकर (वय ४१) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. वाई तहसील कार्यालयातील सेतू विभागात २५ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीमती अक्काबाई विटकर हिने वडार या जातीचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये कागदपत्र जोडलेली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “फडणवीसांना गृहखातं झेपत नसल्याचा आणखी एक पुरावा…”, सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, “छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी…”

चंद्रकांत कृष्णा शिंदे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात फेरबदल करत हणमंत व्यंकपा विटकर असे नाव लावण्यात आले होते. संबंधित महिलेने मराठा जात ऐवजी वडार जात लावून जन्म तारखेत बदल करत वडार जातीच्या दाखल्याची मागणी केली. याप्रकरणी वाई तहसील कार्यालयातील लिपीक मारुती साबळे यांनी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.