सातारा : नरेंद्र मोदींचे सरकार हिंदू आणि मुस्लिमांना जोडू इच्छिते. या सरकारच्या सर्व योजनांचा फायदा मुस्लिम समुदायालाही मोठ्या प्रमाणात होत आहे. आमचे एनडीए सरकार हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद करत नाही. सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आरक्षण दिले, ज्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश होता. वक्फ बोर्डाची जमीन फक्त काही लोकांच्या हातात होती आणि ती मुस्लिम समुदायासाठी फायदेशीर नव्हती. नव्या मंजूर होणाऱ्या विधेयकाचा गरीब मुस्लिमांना फायदा होईल असे सांगत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजानबाबत घेतलेली भूमिका योग्य असल्याचा दावा आठवले यांनी केला. साताऱ्याच्या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षानेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दडवून ठेवला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या मताशी मी सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे किती मोठे आणि शूरवीर योद्धे होते हे आता जनतेला समजायला लागले आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची नवीन पिढीला ओळख झाली. त्यांचा खरा इतिहास जनतेसमोर येत आहे असे सांगितले. नरेंद्र मोदींचे सरकार हिंदू आणि मुस्लिमांना जोडू इच्छिते. त्यांच्या सरकारने समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना आरक्षण दिले, ज्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश होता. जन धन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना आहेत. मुस्लिम समुदायालाही या योजनांचा फायदा होतो. म्हणून, आमचे एनडीए सरकार हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद करत नाही. वक्फ बोर्डाची जमीन फक्त काही लोकांच्या हातात होती आणि ती मुस्लिम समुदायासाठी फायदेशीर नव्हती. म्हणून, मंजूर होणारे विधेयक गरीब मुस्लिमांना फायदा देईल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आत्ताच पुढे यायचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून आठवले म्हणाले औरंगजेबाची कबर काढून इतिहास बदलणार नाही. मात्र यामुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल. हे टाळण्यासाठी सरकारने हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे दंगलीही होणार नाहीत आणि लोकांमधील गैरसमज वाढतील.
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आम्हीही १७ वर्षे संघर्ष केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अजानच्या मुद्द्यावर आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अजानबाबत केलेले वक्तव्य म्हणजे अजानबाबत त्यांची चांगली भूमिका आहे. पूर्वीच्या काळात घड्याळं नव्हती. तेव्हापासून ही अजानची प्रथा आहे असल्याचे त्यांनी सांगितले. नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत म्हणाले, तेव्हा आम्ही दोघेही नव्हतो. इतिहास हा इतिहास आहे. अनेक विश्वासू मुस्लिम जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत काम करत होते. त्यामुळे राणे यांच्या मताशी मी सहमत नाही.
भारतातील सर्व नद्या शुद्धच आहेत. सगळ्यांच्या आंघोळीचं पाणी प्रयागराजला गंगा नदीत असते. राज ठाकरे यांचे विधानच चुकीचे असून प्रयागराजला महाकुंभमेळाव्यावेळी निर्मळ असेच गंगेचे पाणी होते, असा दावा करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून खरपूस समाचार घेतला. दरम्यान, त्यांनी बौद्धगया येथील विहाराची जागा ही बौद्ध समाजाच्या ताब्यात दिली पाहिजे, असेही त्यांनी निक्षून सांगितले. स्वारगेटची घटना गंभीर आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने लक्ष दिले पाहिजे. जो प्रकार घडला तो योग्य नव्हता. स्वारगेट प्रकरणाचा निकाल सहा महिन्याच्या आत लागला पाहिजे, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.