सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचा फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. आज पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीने आज वाहतूक कोंडी झाली, पर्यटकांचे हाल झाले. आजच्या वाहतूक आणि पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. कास पठार फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मागील काही दिवसांपासून कास पठार पर्यटकांच्या गर्दीने भरभरून वाहत आहे. कासवर मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिचे झाले असून अजून काही दिवसच हा फुलोस्तव पर्यटकांना पाहता येणार आहे. शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवस असल्याने मोठी गर्दी होती. आज दुपारनंतर आलेल्या पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. ऑनलाईन बुकींग करून साधारणपणे पाच हजार लोक येतात तर थेट येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच हजारांच्या वरती होती. दहा हजारांहून अधिक पर्यटक एकाच दिवशी आल्याने नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली. समितीने ऑफलाईन आलेल्या पर्यटकांचे बुकिंग दुपारनंतर बंद केल्याने आणि वाहनतळ वाहनतळावर वाहनांसाठी जागाच उपलब्ध नसल्याने पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या केल्या त्यामुळे पर्यटकांना चालत जाणे ही दुरापास्त झाले. आज रविवार असल्याने सातारा शहरापासूनच येवतेश्वर घाट आणि कास पठार रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून नेहमी प्रमाणे वाहतूक कोंडी झाली. सातारा तालुका पोलिसांनी वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु वाहनांची संख्या जास्त असल्याने त्याचे प्रयत्नही तोकडे पडले.
कास पठारावर पर्यटकांची गर्दी; पुन्हा वाहतूक कोंडी
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचा फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. आज पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली.
Written by लोकसत्ता टीम
सातारा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-09-2024 at 22:08 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara traffic jam on kaas plateau huge tourist crowd css