वाई : सलग सुट्यांमुळे पर्यटनाहून आणि गावाकडून परतणाऱ्या प्रवाशांमुळे सातारा-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील आनेवाडी व खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या मार्गावर जागोजागी खंबाटकी घाटातही अनेक वाहने बंद पडून वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग व सातारा पोलिसांनी प्रयत्न करत आहेत. सातारा पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडीत अनेक प्रवासी गाड्यात व रांगात अडकून पडले आहेत. मुंबई-पुण्यातून अनेक जण आपल्या गावी तसेच महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूरसह कोकणातील विविध पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी बाहेर पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : प्रिसिजन जागतिक महिला मानांकन खुले टेनिस : एकेरीत भारताची सहजा यमलापल्ली विजेती

सातारा पुणे महामार्गावर खेड शिवापूरपासून ते साताऱ्याजवळील खिंडवाडीपर्यंत जागोजागी वाहतूक कोंडी झालेली दिसून आली. दरम्यान या कोंडीतून वाहने काढणे जिकिरीचे झाल्याने प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत. आज दिवसभर पाचगणी महाबळेश्वर येथेही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज सायंकाळ पासून पुण्या मुंबईकडे जाणारे वाहने वाढल्याने रस्त्याला वाहनांच्या जत्रेचे स्वरूप आले आहे. वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी पाच ते आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. आज पुन्हा महामार्गावर खेड शिवापूरपासून ते साताऱ्याजवळील खिंडवाडीपर्यंत जागोजागी वाहतूक कोंडी झालेली आहे. या रस्त्यावर अवजड वाहनेही आहेत. दरम्यान या कोंडीतून वाहने काढणे जिकिरीचे झाल्याने सीएनजी गॅसवरील वाहने गरम होऊन बंद पडली आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara traffic jam on satara pune highway for the second day css