सातारा/वाई : केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत बुद्ध सर्किट, रामायण सर्किट अशी सर्किट पर्यटकांसाठी विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. खासदार उदयनराजे यांनी जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास भारतीयांबरोबरच जगभरातील पर्यटकांनी प्रत्यक्ष भेट देऊन समजावून घ्यावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले शाहू महाराज या सर्वांचेच शौर्य, पराक्रम आणि देदीप्यमान इतिहासाचा प्रसार व्हावा आणि त्यायोगे रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक उन्नती व्हावी. त्यासाठी मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना त्यांनी मांडली.
‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करावे – उदयनराजे भोसले
मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना त्यांनी मांडली.
Written by लोकसत्ता टीम
सातारा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-12-2023 at 20:01 IST
TOPICSउदयनराजे भोसलेUdayanraje Bhosaleकेंद्र सरकारCentral Governmentछत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji Maharajपर्यटनTourismमराठी बातम्याMarathi NewsसाताराSatara
+ 2 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In satara udayanraje bhosle meet central minister of tourism g kishan reddy for shiv swarajya circuit css