सातारा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने घोषणा झाल्यापासून सातारा शहरासह जिल्ह्यात उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी हजारो महिलांनी तलाठी चावडी, ग्रामपंचायत पासून ते तहसीलमधील सेतू कार्यालयात तुडुंब गर्दी केल्याने मोठा गोंधळ उडाला. महिलांमध्ये ढकलाढकलीचे आणि आरोप प्रत्यारोपाचे प्रसंग घडले. गर्दीला आवरताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने घोषणा झाल्यापासून त्याची अर्ज प्रक्रिया करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी साताऱ्यातील हजारो महिलांनी गावच्या तलाठी सर्कल चावडी पासून सेतूपर्यंत एकच गर्दी केली. शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर शपथपत्र करावयाचे असल्याने शंभर रुपयाच्या स्टॅम्प साठीही मोठी गर्दी झाली. शंभर रुपयाची स्टॅम्पच्या तुटवडा निर्माण झाल्याने महिलांमध्ये गोंधळ, मारामारीचे प्रसंग निर्माण झाले. भर पावसात महिलांना छत्री हातात घेऊन रांगेत उभे राहावे लागले.
हेही वाचा : सांगलीत आढळले अल्बिनो जातीच्या सर्पाचे पिल्लू
नागरी सेतू सुविधा केंद्र या सेतू मधील कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री आठ तसेच सुट्टीच्या दिवशी कामकाज करावे लागणार असल्याने कामाचा ताण आला आहे.अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित होत असून इंटरनेट सुविधा बंद होत आहे. या गोंधळाचा परिस्थितीचा विचार करून सरकारने या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मनीष महाड वाले व कार्यकर्त्यानी निवेदन देऊन केली आहे. या योजनेसाठी गर्दी होत असल्याने ठिकठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.