सावंतवाडी : देवगड हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. हापूस आंब्याला मागणीही मोठ्या प्रमाणात असते. मात्र पर्यावरणीय बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बागायतदार आणि खवय्ये हिरमुसले आहेत. यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला वांझ-मोहरामुळे दगा दिला आहे. त्यामुळे ३० टक्के आंबा उत्पादन होणार आहे. बदलत्या हवामानाने हा घात केला असून तिसऱ्या टप्प्यातील मोहरही गायब झाला आहे.परिणामी मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी स्वस्त उपलब्ध होणारा हापूस आंबा यावर्षी मात्र दुरापास्त होण्याची शक्यता आहे. आंब्याची चव यावर्षी महागणार आहे. मार्च महिना उजाडला तरी देखील एक डझन आंब्याची किंमत १३०० ते १५०० प्रति डझन रुपयापर्यंत आहे. तसेच बाजारपेठेत आवकही कमीच आहे.

जगप्रसिद्ध असलेला देवगड हापूस आंबा आता कुठे किरकोळ प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन दोन ते तीन टक्के झाले आहे. सध्या तरी आंब्याचा एक डझन १३०० ते १५०० रुपये आहे. पहिल्या टप्प्यातील जे उत्पादन आले त्यातील बरेचसे उत्पादन मुंबई वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आले. मात्र त्याचे प्रमाण खूप अल्प आहे. नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात मोहर आल्यानंतरचा हा पहिल्या टप्प्यातील आंबा आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा आता २० मार्च ते २० एप्रिल या कालावधीत बाजारपेठेत दाखल होईल. मात्र दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी ३० टक्के झाले आहे. हा दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंबा स्थानिक बाजारात व महाराष्ट्रातील इतर बाजारपेठ्यांमध्ये जातो. परदेशातही आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंब्याचा दर जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हवामान बदलाचा परिणाम

तिसऱ्या टप्प्यातील जो मोहर येतो तो फेब्रुवारी महिन्यात येतो याच मोहराची फळे मे महिन्यात तयार होतात आणि तो स्थानिक बाजारात येतो हाच आंबा कॅनिंग साठी वापरला जातो परंतु या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील आंबा मोहोर आलाच नसल्या नसल्यामुळे परिणाम स्वरूप मे महिन्यात येणारा आंबा अल्प प्रमाणात असणार हे निश्चित असून फवारणीसाठी लागलेल्या औषधांचा खर्च देखील उत्पन्नातून मिळणार नसल्याची खंत आंबा बागायतदार नंदा वाळके यांनी व्यक्त केली.

सातत्याने निसर्गात होणाऱ्या बदलाचा फटका देवगड हापूस आंब्याला बसला असून दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन यावर्षी ३० टक्केच झाले आहे दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंबा स्थानिक बाजारात व महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये जातो मात्र यावर्षी आंब्याचे उत्पादन अत्यंत कमी असल्यामुळे यंदा आंबा डोळ्यातून अश्रू काढणारा असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध अंबाबागायतदार विनायक जोईल यांनी दिली

देवगड हापूस आंबा ३० टक्के उत्पादन घटले

आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मोहर आला मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे व वांज मोहराचे प्रमाण जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन दोन ते तीन टक्केच झाले जर जानेवारी महिन्यातही मोहर समाधानकारक आला नाही यामुळे दुसऱ्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन ३० टक्के असल्याची शक्यता आहे शेवटच्या टप्प्यातील दाखल होणारा आंबाही फार कमी असेल व कॅनिंग साठी आंबा उपलब्ध होणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया देवगड येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी दिली.

देवगड हापूस युनिक कोडचा वापर

देवगड आंबा उत्पादक संस्था व्यवस्थापक संतोष पाटकर म्हणाले,देवगड हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. त्याला जीआय मानांकन मिळाले आहे. देवगड हापूस आंबा बोगस पध्दतीने विक्री होत असल्याने बोगस विक्री रोखण्यासाठी युनिक कोडचा वापर देवगड आंबा उत्पादक संस्थेने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवगड हापूस आंब्याची ओळख पटणार आहे.

Story img Loader