सावंतवाडी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट झाली असून आज मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा निवडणूक पथकाने रोखला. त्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या गाड्यांची तपासणी पथकातील कर्मचारी यांनी केली. पोलीस कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोगाचेही कर्मचारी गोव्यातून सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करीत आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग सलग दोन दिवस वणी व औसा येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा असून ते व्हाया गोवा सिंधुदुर्ग दौऱ्यावर दुपारी एकच्या सुमारास बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका येथे आले . इन्सुली तपासणी नाका येथे उपस्थित निवडणूक पथकाने त्यांचा ताफा रोखला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे एका गाडीत होते त्यांच्या गाडीची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या अन्य गाड्यांची तपासणी पथकातील कर्मचारी यांनी केली. यावेळी काही काळ गाडीकडे कोणी अधिकारी व कर्मचारी न आल्याने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गाडी का थांबवली अशी विचारणाकेली असता कोणीच कर्मचारी येईना त्यावेळी ताफ्यात असलेले शिवसेनेचे पदाधिकारी शैलेश परब यांनी उपस्थितांना गाडी का थांबवली अशी विचारणा केली मात्र यावेळी कोणीच काही न बोलल्याने पुढील वाहनांना रवाना होण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद”, मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानाचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण

सलग दोन दिवस प्रचार दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची हेलिपॅडवरच तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे त्याचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता. बॅगांची तपासणी न करता आज केवळ गाडीची पाहणी करून पथकातील सर्व कर्मचारी अन्य गाड्यांची तपासणी करण्यासाठी गेले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sawantwadi mumbai goa national highway uddhav thackeray convoy stopped for inspection ahead of assembly election 2024 css