सावंतवाडी : कोकण आणि शिवसेनेचे अतुट नाते पूर्वीपासूनचे आहे. शिवसेना – कोकण नात्यात संभ्रम निर्माण करून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो कदापि यशस्वी होऊ द्यायचा नाही. कोकण म्हणजे आपले आयुष्य ते गुंडा-पुडांच्या ताब्यात देऊन उपयोगाचे नाही तसेच कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. यादरम्यान ठाकरे यांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना “खाली मुंडी पाताळ धुंडी…मनी नाही भाव देवा मला पाव” असे म्हणत केसरकर यांचा पराभव झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चांगले होईल असा टोला हाणला.

महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार परशुराम उपरकर,शिवसेना उपनेते शरद कोळी, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब,जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, माजी सभापती जयप्रकाश चमणकर,रेवती राणे, डॉ जयेंद्र परुळेकर, आदी उपस्थित होते.

Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती? पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे आहे जास्त मालमत्ता
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Sharad Pawar On Dilip Walse Patil
Sharad Pawar : शरद पवारांचा दिलीप वळसे पाटलांना जाहीर इशारा; म्हणाले, ‘गद्दाराला शिक्षा द्यायची, १०० टक्के…’
What Sharad Pawar Said About Devendra Fadnavis?
Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”
uddhav Thackeray bag check up marathi news
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर तपासणी
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवार म्हणाले, “पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला…”

शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांना शिवबंधन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधले ते म्हणाले, कोकण आणि शिवसेना हे अतुट नाते आहे. शिवसेनेत राजन तेली परशुराम उपरकर हे पुन्हा परतले तर सुधीर सावंत यांनी आज प्रवेश केला आहे. सर्व मिळून एकत्रित काम करतील. आमदार केसरकर यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, आताचे आमदार खाली मुंडी पातळ धुंडी, खाली बघून बोलतात सज्जन सभ्य माणूस वाटला. साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र तो विसरला त्याच्या मनी श्रद्धाही नाही सबुरीही नाही, मनी नाही भाव देवा मला पाव असे ते असल्याची टीका केली.

ठाकरे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणीतील पुतळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, तो पैसे खाऊन केला आहे, मोदी हे शिवभक्त नाही, ऊन वारा पाऊस,लाटा सहन करून सिंधुदुर्ग किल्ला उभा आहे मात्र दाढीवाले मिंधे हा पुतळा वाऱ्याने पडला म्हणताहेत. हा खाली मुंडी पातळ धुंडी म्हणतोय, वाईटातून चांगलं होतं असं म्हणणाऱ्या केसरकर यांचा पराभव झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चांगलं होणार असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, खाण मालक,हॉटेल उद्योजकाच्या चरणी केसरकर यांनी आपली लाज वाहून टाकली आहे. सावंतवाडीला मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मी दिले ते झाले नाही. केसरकर व हाॅटेल उद्योजक सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या सीमेवर उद्योगपती अदानीला गोल्फ कोर्स साठी जागा शोधत आहे. ते अदानी चे दलाल बनून कोकण च्या सातबारावर अदानी नामकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत .पण कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही. कोकण आपल्या हक्काचे आहे ते अदानी च्या घशात घालायला देणार नाही. धारावीत अदानी च्या घशात घातलेली जमीन महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर पुन्हा काढून घेऊन गिरणी कामगारांच्या घरांना दिली जाईल.

हेही वाचा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर तपासणी

ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली आज लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर यांना लाडकी बहीण, शेतकरी आठवलेत. आम्ही बोलल्याप्रमाणे करतो. दहा वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत होती या ठिकाणी विनायक राऊत यांना पाठवले विनायक राऊत ठाण मांडून बसलेत आणि दहशतमुक्त सिंधुदुर्ग जिल्हा करून ते दोनदा खासदार झालेत. कोकणने पुन्हा एकदा उभारी घेतली.महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहणाऱ्यांना जनता यावेळी धडा शिकवेल आमचा महाविकास आघाडीचा वचननामा आहे मुला मुलींना मोफत शिक्षण, ज्येष्ठ नागरिक, लाडक्या बहिणी सगळ्यांना योजना ,आरोग्यासाठी २५ लाख चा कॅशलेस मेडिक्लेम दिला जाईल.

ठाकरे म्हणाले, आज पर्यंत गद्दारांना भाव होता. मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीं आणि शेतकऱ्यांची या लोकांना आठवण झाली. गुंडगिरी पुंडगिरी मला हेलिकॉप्टर येऊ नका रस्त्याने या म्हणून आव्हान दिले मी रस्त्याने आलो आहे. मालवण राजकोट येथील शिव पुतळा कोसळल्यानंतर शिवद्रोही , महाराष्ट्र द्रोही एकत्र झाले. काळे कृत्य खुप झाली पण आता सावंतवाडी पासून कोकणपट्टी आणि मुंबई पर्यंत भगवा झेंडा डौलाने फडकला पाहिजेत. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

हेही वाचा : Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद”, मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानाचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण

महाविकास आघाडीच्या बंडखोरीवर बोलताना ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीला स्थान नाही जागावाटपाच्या वेळी प्रत्येक पक्षाला मतदार संघ सुटला होता. तरीसुद्धा महाविकास आघाडीचे सत्तेत येण्यासाठी बंडखोरीला वाव दिला जाऊ नये बंडखोरी झाल्याने सर्वांनी एकत्रित जिंकण्याचे आवाहन त्यांनी केले

यावेळी राजन तेली जिंकतील असा आशावाद ठाकरे यांनी व्यक्त करून ते लोकसभेच्या दरम्यान आले असते तर लोकसभा निवडणूक सुद्धा जिंकलो असतो. शैलेश परब, रूपेश राऊळ, बाबुराव धुरी,बबन साळगावकर, परशुराम उपरकर, राजन तेली असे सर्व मंडळी एकजूट दाखवतील असे ते म्हणाले ‌

माझ्या मुलावर दोन वेळा हल्ला

राजन तेली म्हणाले, माझ्या मुलावर दोन वेळा हल्ला झाला. मुलांसाठी बाप म्हणून मी धावून गेलो. कदाचित यापुढे धोका निर्माण होऊ शकतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाला आधार द्यावा. मी धोका पत्करून लढण्याची प्रतिज्ञा केली आहे.